आधी गणपती अन् आता वाढदिवसालाही राकेश बापटसोबत दिसली EX WIFE, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:37 IST2025-09-03T15:53:21+5:302025-09-03T16:37:22+5:30

६ वर्षांपूर्वीच झालेला दोघांचा घटस्फोट, पुन्हा एकत्र दिसतायेत राकेश-रिद्धी

मराठी अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतून मराठी प्रेक्षकांचा लाडका झाला. अनेक वर्ष हिंदीत काम केल्यानंतर त्याने पहिल्याच मराठी मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं.

दरवर्षी गणेशोत्सवात राकेश बापट चर्चेत असतो. तो स्वत:च्या हातांनी उत्तमरित्या बाप्पाची मूर्ती घडवतो. त्याने त्याच्या काही सहकलाकारांनाही मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे.

यंदाही राकेशने बाप्पाची सुंदर मूर्ती घडवली. त्याच्या घरी जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा राकेशची पूर्व पत्नी रिद्धी डोगराकडे वळल्या.

रिद्धी डोगरा यंदा राकेशच्या कुटुंबासोबतच होती. विसर्जनाच्या दिवशीही ती दिसली. ६ वर्षांपूर्वीच दोघं विभक्त झाले होते. मग रिद्धी पुन्हा राकेश आणि त्याच्या कुटुंबासोबत कशी असाच प्रश्न अनेकांना पडला.

इतकंच नाही तर रिद्धी राकेशच्या अनेक पोस्टवर कमेंटही करत आहे. राकेशने एका संस्थेमध्ये जाऊन शाळकरी, तरुण मुलांना बाप्पाची मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण दिलं. यावरही रिद्धीने कमेंट करत त्याचं भरभरुन कौतुक केलं.

शिवाय नुकताच राकेशने जवळच्या मित्रपरिवारासह वाढदिवस साजरा केला. त्याने केक कट करतानाचे फोटो शेअर केले. त्यातही रिद्धी दिसत आहे.

रिद्धीला राकेशसोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच काहींनी कमेंट्समध्ये रिद्धीला ट्रोलही केलं आहे. 'कधीही पाहा आजकाल राकेशच्या मागे असते','काही लोक कधीच पिच्छा सोडत नाहीत' अशा कमेंट्स आल्या आहेत.

राकेश आणि रिद्धीची ओळख 'मर्यादा' मालिकेच्या सेटवर झाली होती. नंतर ते प्रेमात पडले. २०११ मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र त्यांच्यात खटके उडायला लागले आणि ८ वर्षांनंतर २०१९ साली त्यांनी घटस्फोट घेतला.

राकेश बापटचे फिल्मी करिअर पाहिजे तसे यशस्वी ठरले नाही. ‘तुम बिन’,’दिल विल प्यार व्यार’, ‘नाम गुम जाएगा’, ‘गिप्पी’ या हिंदी सिनेमांसोबतच ‘वृंदावन’, ‘सविता दामोदर परांजपे’ मराठी सिनेमातही तो झळकला आहे.

२०२१ मध्ये राकेश बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाला. इथे त्याचं शमिता शेट्टीसोबत अफेअर गाजलं. बाहेर आल्यावरही त्यांचं रिलेशनशिप सुरु होतं. मात्र काही काळानंतर दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला.