IN PICS : दुसरी भेट अन् ते २ तास...; रामायणातील सीतेला कसा मिळाला खऱ्या आयुष्यातील ‘राम’?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 06:33 PM2023-04-11T18:33:40+5:302023-04-11T18:40:54+5:30

Dipika Chikhlia Love Story : सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका यांच्या खऱ्या आयुष्यातील ‘राम’बद्दल तुम्हाला माहित आहे का

रामायण ही लोकप्रिय मालिका. या मालिकेनं लोकांना अक्षरश: वेड लावलं होतं. रामायणात रामाची भूमिका ही अभिनेते अरुण गोविल यांनी साकारली होती. तर सीतेची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी साकारली होती. पण सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका यांच्या खऱ्या आयुष्यातील ‘राम’बद्दल तुम्हाला माहित आहे का?

दीपिका यांच्या खऱ्या आयुष्यातील रामाचं नाव हेमंत टोपीवाला असं आहे. दीपिका व हेमंत यांची लव्हस्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे. एका मुलाखतीत खुद्द दीपिका यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती.

दीपिका यांनी १९९१ साली हेमंत यांच्याशी लग्नगाठ बांधली. हेमंत हे एक बिझनेमॅन आहे. त्यांचा श्रृगांर या कॉस्मेटिक ब्रँडचे ते मालक आहेत.

दीपिका व हेमंत यांची पहिली भेट सुनी मेरी लैलाच्या सेटवर झाली होती. दीपिका यांचा हा डेब्यू सिनेमा होता. यातील एका सीनमध्ये त्यांना श्रृंगारची जाहिरात करायची होती.

या जाहिरातीच्या शूटींगवेळी हेमंत सेटवर हजर होते. त्यांना जाहिरातचं शूटींग बघायचं होतं. याचदरम्यान हेमंत व दीपिका यांची पहिली भेट झाली होती. पण त्या भेटीनंतर दोघंही आपआपल्या कामात बिझी झालेत. अर्थात पहिली भेट ते विसरले नव्हते.

यानंतर एका ब्युटी पार्लरमध्ये दीपिका व हेमंत यांची दुसरी भेट झाली. एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून ही भेट झाली होती. त्या दोन तासांच्या भेटीत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

दीपिका आणि हेमंत दोघांनी लगेच आपल्या कुटुंबियांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. दोघांच्या घरच्यांनी देखील लगेच दोघांच्या नात्याला होकार दिला आणि साखरपुड्यानंतर ७ महिन्यात दोघांनी लग्न देखील केलं.

दीपिका आणि हेमंत यांनी सुखाने नांदत आहेत. दोघांना जुही आणि निधी अशा दोन मुली आहेत. दीपिका सध्या ॲक्टिंग क्षेत्रात फार ॲक्टिव्ह नाहीत. सोशल मीडियावर मात्र त्या प्रचंड सक्रीय आहेत.