"आयुष्यात लग्न करणं गरजेचं आहे का?" प्राजक्ता माळीचा प्रश्न, श्री श्री रविशंकर म्हणाले- "तुम्ही मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 17:00 IST2025-08-15T16:45:22+5:302025-08-15T17:00:21+5:30
प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात ती श्री श्री रविशंकर यांना लग्नासंबंधी प्रश्न विचारताना दिसते. पुढे काय होतं? बघा

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय
प्राजक्ता माळी जसं वेळ मिळेत तसं श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात जाताना दिसते. प्राजक्ताने त्यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्सही केलाय
प्राजक्ता माळीची एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झालीये. या क्लीपमध्ये ती श्री श्री रविशंकर यांना, "आयुष्यात लग्न करणं खरंच गरजेचं आहे का?" असा प्रश्न विचारताना दिसते
प्राजक्ताच्या या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ते सुरुवातीला हसत हसत म्हणाले, 'तुम्ही हा प्रश्न मला विचारताय. असं असतं तर माझ्या बाजूला आणखी एक खुर्ची लागली असती. आणखी एक सोफा लावावा लागला असता.'
श्री श्री रविशंकर यांनी थोडा विचार केला आणि नंतर ते म्हणाले, "अशी काही आवश्यकता नाही. लग्न करुन असो किंवा एकट्याने असो फक्त आनंदी राहिलं पाहिजे."
श्री श्री रविशंकर पुढे म्हणाले, "काही लोकांचं काय होतं, ते लग्न करूनही दु:खी असतात आणि एकट्यातही दु:खीच असतात. तर काही लोक असेही असतात. जे लग्न न करताही आनंदी राहतात आणि लग्न करूनही आनंदी राहतात."
श्री श्री रविशंकर शेवटी म्हणाले, "त्यामुळे हे तुम्ही ठरवा. तुम्हाला काय आवडतं. मला वाटतं की आनंदी राहण्याचा पर्याय सर्वांनी निवडायला हवा"