पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमसोबत रिलेशनशिपमध्ये आहे 'ही' अभिनेत्री; खुलासा करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:27 IST2026-03-17T13:12:47+5:302026-03-17T13:27:39+5:30
पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार बाबर आझम हा त्याच्या खेळासोबतच अनेकदा खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाबर आझम आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) हा त्याच्या खेळासोबतच अनेकदा खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाबर आझम आणि पाकिस्तानी अभिनेत्री जुबाब राणा (Zubab Rana) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या प्रकरणावर खुद्द जुबाबने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर जुबाब राणा आणि बाबर आझम यांच्या अफेअरच्या बातम्या वेगाने पसरल्या होत्या. नेटकऱ्यांनी या दोघांच्या नावावरून त्यांना ट्रोल करण्यासही सुरुवात केली होती

एका मुलाखतीदरम्यान या अफवांबद्दल विचारले असता जुबाबने स्पष्ट शब्दांत नकार दिला. ती म्हणाली, "मला समजत नाही की लोक अशा गोष्टी कुठून शोधून काढतात.''

माझ्या आणि बाबर आझममध्ये असं काहीही नाहीये. आम्ही एकमेकांना ओळखतही नाही आणि कधी भेटलोही नाही." जुबाब पुढे म्हणाली की, "सोशल मीडियावर कोणीही उठतं आणि काहीही लिहितं.

कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल अशा अफवा पसरवणं चुकीचं आहे. मी सध्या फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे आणि अशा बिनबुडाच्या चर्चांना मी महत्त्व देत नाही."

जुबाब राणा ही पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. आपल्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

















