'या' कलाकारांनी धुडकावली 'बिग बॉस मराठी ३'ची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 10:26 AM2021-09-20T10:26:04+5:302021-09-20T10:54:01+5:30

Bigg Boss Marathi 3: यंदाच्या पर्वात बिग बॉसच्या घरात अनेक नवनवीन चेहरे पाहायला मिळत आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत राहणारा बिग बॉस मराठी या शोच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वात बिग बॉसच्या घरात अनेक नवनवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. मात्र, या स्पर्धकांपूर्वी कलाविश्वातील काही लोकप्रिय सेलिब्रिटींना बिग बॉसची ऑफर मिळाली होती. मात्र, या सेलिब्रिटींनी ती ऑफर धुडकावली. त्यामुळेच बिग बॉसला नकार देणारे सेलिब्रिटी कोण ते पाहुयात.

सुयश टिळक - मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक याला बिग बॉसची ऑफर मिळाली असतं सांगण्यात येतं. सोशल मीडियावरही त्याच्या नावाची प्रचंड चर्चा झाली होती. मात्र, सुयशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत बिग बॉसच्या वृत्ताचं खंडण केलं आणि मी या शोमध्ये सहभागी होत नसल्याचं स्पष्ट केलं.

अपूर्वा नेमळेकर - रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अपूर्वा नेमळेकर हिच्यादेखील नावाची चर्चा सुरु होती. मात्र, अपूर्वाने आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये मी अजिबात बिग बॉसच्या घरात जाणार नाही, असं सांगितलं.

केतकी चितळे - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी केतकी चितळेला बिग बॉसची ऑफर मिळाल्याचं म्हटलं जातं. मात्र, केतकीनेदेखील ही ऑफर धुडकावली.

प्रणित हाटे - प्रणित हाटे ऊर्फ गंगा सध्या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखला जातो. कारभारी लयभारी मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या प्रणितचा फॅनफॉलोविंग पाहता तो बिग बॉसमध्ये सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र, ‘बिग बॉस मराठी’ मध्ये सहभागी होणार नाही. या शोचा भाग होऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करायला मला आवडेल मात्र या शोच्या निर्मात्यांकडून मला कोणत्याही प्रकारची ऑफर आली नाही, असं त्याने स्पष्ट केलं.

ऋषी सक्सेना - काहे दिया परदेस या मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या ऋषीचे आज लाखो चाहते आहेत. त्यामुळे त्यालादेखील इन्स्टाग्रामवरील Ask me anyting मध्ये नेटकऱ्यांनी बिग बॉसविषयी प्रश्न विचारले होते. मात्र,मी बिग बॉसमध्ये सहभागी होणार नाही, असं त्याने स्पष्ट केलं होतं. (All Photos-social media/ facebook)