Nilesh Sabale: "कॉलेजमधली ती भेट अन्...", निलेश साबळेची लव्हस्टोरी; कोण आहे त्याची पत्नी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 09:32 IST2025-07-04T09:26:22+5:302025-07-04T09:32:27+5:30

निलेश साबळेच्या पत्नीला पाहिलंय का? दिसते खूप सुंदर, अशी आहे लव्हस्टोरी

सलग १० वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ निलेश साबळेने(Dr Nilesh Sabale) केलं होतं. सध्या निलेश साबळे चर्चेत आहे.

'चला हवा येऊ द्या'चं आता नवीव पर्व सुरु होत आहे. यामध्ये निलेशच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे. सिनेमाच्या शूटमध्ये असल्याने आपण नव्या पर्वाला नकार दिल्याचा त्याने नुकताच खुलासा केला.

निलेश साबळेचा मोठा चाहतावर्ग आहे. तो आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एम. एस. पदवीधर आहे.लेखन, सूत्रसंचालन आणि विनोदी कौशल्याने चला हवा येऊ द्या शोला एका उंचीवर नेऊन ठेवले होते.

निलेश साबळेची पत्नी कोण आहे? २०११ साली निलेश साबळेने पुण्यातील मैत्रीण गौरीसोबत लग्न केले. आधी मैत्री, मग प्रेम आणि त्यानंतर लग्न अशी आहे निलेश साबळेची लव्हस्टोरी.

एका स्पर्धेदरम्यान निलेश साबळे आणि गौरीची भेट झाली होती. निलेश मिमिक्री करायचा आणि गौरी गायनासाठी स्पर्धेत उतरली होती. एका मित्राने दोघांची ओळख करुन दिली. मात्र तेव्हा त्यांचं बोलणं झालं नाही आणि ते आपापल्या मार्गाला लागले.

काही दिवसांनी निलेश गौरीच्या कॉलेम्ध्ये गेला होता. तिथे त्यांची परत भेट झाली. तेव्हा मात्र दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि त्यांचं बोलणं सुरु झालं.

निलश साबळेने डॉक्टरकी करण्यात काही रस नसल्याचे आधीच गौरीला सांगितले होते. गौरीचीही यावर काहीच हरकत नव्हती. तिने त्याला तुझं स्वप्न पूर्ण कर, मी घर चालवेन असं सांगितलं होतं.

काही वर्ष डेट केल्यानंतर निलेश आणि गौरी दोघे विवाहबंधनात अडकले. निलेशच्या करिअरसाठी गौरी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली.