एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले निक्की अन् अरबाज, नव्या रोमँटिक फोटोशूटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:34 IST2025-02-04T11:30:42+5:302025-02-04T11:34:26+5:30

हॉट केमिस्ट्री असलेल्या जोडीचं नवं रोमँटिक फोटोशूट

'बिग बॉस मराठी'च्या घरात एकमेकांच्या प्रेमात पडलेले निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) यांची चर्चा कायम असते.

हॉट & फिट कपल म्हणून हे कपल ओळखलं जात आहे. आता निक्की आणि अरबाजनं सर्वांचं लक्ष खेचलं आहे.

निक्की आणि अरबाजने पुन्हा एकदा नवे रोमँटिक फोटोशूट केले आहे.

नव्या रोमँटिक फोटोशूटमधील काही फोटो निक्कीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंना तिने "हा यही प्यार है" असं खास कॅप्शन दिलं आहे.

निक्की-अरबाजच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

निक्की आणि अरबाज नेहमीच एकमेकांसोबत वेळ घालवणे पसंत करतात.

दोघांनी मीडियासमोरही अनेकदा ते एकमेकांना आवडतात याची कबुली दिली आहे.

एकमेकांचा हातात हात घेऊन निक्की आणि अरबाज फिरताना दिसतात. काही दिवसांपुर्वी ते दोघे एकत्र Vacationवरही गेले होते.

निक्कीचा हॉट अंदाज नेहमीच पाहायला मिळत असतो. बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यानंतर आता निक्की 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' शोमध्ये दिसतेय.