PHOTO: 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील कलाकारांची ऑफस्क्रीन धमाल, केमिस्ट्रीची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:55 IST2025-01-28T13:43:11+5:302025-01-28T13:55:11+5:30
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेची चांगलीच चर्चा होताना दिसतेय.

२३ डिसेंबर २०२४ पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
या मालिकेत अभिनेता अभिजीत आमकर आणि अभिनेत्री शर्वरी जोग यांची प्रमुख भूमिका आहे.
या मल्टिस्टारर मालिकेत रुपल नंद, मधुरा जोशी, आशुतोष गोखले यांसारख्या तगड्या कलाकारांची फळी पाहायला मिळतेय.
शिवाय नुकतीच अभिनेत्री रुचिरा जाधवची 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत एन्ट्री झाली आहे.
रुचिरा मालिकेत लावण्या नावाचं पात्र साकारताना दिसते आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर 'तू ही रे माझा मितवा' मालिकेच्या सेटवरचे फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये अभिजीत, शर्वरी आणि रुचिरा ऑफस्क्रीन धमाल करताना पाहायला मिळत आहेत.
नेटकऱ्यांनी हे फोटो पाहून कलाकारांच्या बॉण्डिंगचंही कौतुक केलं आहे.