ढालेपाटलांच्या सुनेचा थाटचं न्यारा! साडीत खुललं शिवानीचं सौंदर्य, PHOTO पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:24 PM2024-03-27T16:24:48+5:302024-03-27T16:34:35+5:30

दमदार अभिनय आणि सौंदर्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.

छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांना आपलंस केलं.

कलर्स मराठीवरील 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत काम करत शिवानी अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

या मालिकेत तिने साकारलेली संजीवनी म्हणजेच संजू ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली.

त्यावेळेस मालिकेतील ‘संजीवनी ढालेपाटील’ या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

सध्या शिवानी 'सिंधूताई माझी माई' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. शिवानीचा सोशल मीडियावर भलामोठा चाहतावर्ग आहे.

नुकतेच शिवानीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

शिवानीने लाल रंगाची साडी परिधान करून हे फोटोशूट केलं आहे. या साडीवर नाकात नथ, कानात झुबे असे साजेसे दागिने तिने घातले आहेत.