"नार नवेली..." रुपालीचं आरस्पानी सौंदर्य, घायाळ अदांवर नेटकरी फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 15:21 IST2024-04-11T15:10:29+5:302024-04-11T15:21:42+5:30
रुपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे रुपालीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली.
या मालिकेत तिने साकारलेल्या संजना नावाच्या पात्राला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत.
अनेक मराठी नाटके, मालिकांमध्ये काम करत रुपालीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील महत्वाचे अपडेट्स ती या माध्यमातून शेअर करते.
नुकतेच रुपालीने निळ्या रंगाची नऊवारी पैठणी परिधान करून फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये रुपाली फारच सुंदर दिसतेय.
शिवाय तिने नखरेवाली या गाण्यावर केलेली रिल चाहत्यांना प्रचंड आवडली आहे.
नाकात कारवारी नथ, केसात माळलेला गजरा तसेच गळ्यात साजेसे मोत्याचे दागिने असा मराठमोळा साज अभिनेत्रीने केला आहे.