'फुलाला सुगंध मातीचा' फेम मधुरा जोशीचं खास फोटोशूट; नेटकऱ्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:14 IST2024-12-17T12:02:04+5:302024-12-17T12:14:07+5:30
अभिनेत्री मधुरा जोशी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली.
या मालिकेत तिने साकारलेलं 'इमली' नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं.
अभिनयाव्यतिरिक्त मधुरा एक बिझनेसवूमन आहे. तिचा कपड्यांचा व्यवसाय आहे.
सोशल मीडियावरही मधुराची तगडी फॅनफॉलोइंग आहे. त्यामाध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतंच अभिनेत्रीने जांभळ्या रंगाची साडी नेसून सुंदर असं फोटोशूट केलं आहे.
मोकळे केस, कानात झुमके तसेच सिल्क साडी परिधान करून तिने फोटो क्लिक केलेत.
मधुरा या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसतेय.
दरम्यान, मधुरा जोशी लवकरच स्टार प्रवाहवरील आगामी 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे.