मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच आहे 'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा नवरा; सेलिब्रिटींसोबतही खास कनेक्शन, ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:53 IST2025-09-01T15:42:02+5:302025-09-01T15:53:52+5:30

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा नवरा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना देतो फिटनेसचे धडे, ओळखलं?

'डॉक्टर डॉन', 'स्वराज्य जननी जिजामाता', 'माझी तुझी रेशीमगाठ', तसेच 'मुरांबा' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे काजल काटे.

परंतु, 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत तिने साकारलेल्या शेफाली नावाच्या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

काजल काटे सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोशल मीडियावर काजलने तिच्या नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत.

त्यामुळे या कपलची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. काजलसह तिचा नवरा प्रतिक कदम देखीस प्रसिद्धीझोतात आला आहे.

काजलचा पती हा मुंबई इंडियन्सच्या टीमचा फिटनेस कोच आहे. मुंबईच्या संघातील क्रिकेटपटूंना तो फिटनेसचे धडे देतो. शिवाय बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसोबत त्याचं खास कनेक्शन आहे.

काजल देखील क्रिकेटप्रेमी आहे. अनेकदा ती स्टेडिअमध्ये किक्रेटचे सामने पाहण्यासाठी जाते.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे काजोल-प्रतिकच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. याचे फोटो त्यांनी शेअर केलेत. यावेळी दोघांनीही ट्यूनिंग केलेलं पाहायला मिळत आहे. काजोलने लाल रंगाची साडी तर प्रतिकने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.