नाही चंद्रमोळी हारतुरे, तरीही यौवन साजिरे; मधुराणीच्या फोटोंवर चाहतीची लक्ष वेधणारी कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:13 PM2024-04-01T17:13:36+5:302024-04-01T17:20:53+5:30

मधुराणी प्रभुलकर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींंपैकी एक आहे.

मधुराणी प्रभुलकर ही छोट्या पडद्यावरील नावजलेली अभिनेत्री आहे. सध्या मधुराणी स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत काम करते आहे.

या मालिकेत तिने साकारलेल्या अरुंधती या पात्राला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं.

ही मालिका सुरु झाल्यापासून छोट्या पडद्यावर गाजत आहे. यात खासकरुन मालिकेतील अरुंधतीने तर प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतायत. त्यामुळेच या मालिकेसह त्यातील पात्रांनी चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय.

नुकतेच अरुंधतीने म्हणजेच मधुराणीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवलाय.

पिस्ता कलरच्या साडीत अभिनेत्रीने केलेलं हे फोटोशूट खूपच सुदंर आहे.

जियामें इक अगन हैं और में हू! असं कॅप्शन मधुराणीने या फोटोंना दिलंय.

'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.