तुझं रुप हे नक्षत्राचं...! 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्रीचा साडीतील सुंदर लूक; चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:22 IST2025-01-30T12:13:48+5:302025-01-30T12:22:26+5:30

अभिनेत्री रेवती लेलेचा मनमोहक अंदाज, पाहा फोटो.

रेवती लेले ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम करुन ती नावारुपाला आली.

स्टार प्रवाहच्या 'लग्नाची बेडी' या मालिकेत तिने साकारेलेलं मधुराणी हे पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.

याशिवाय 'स्वामिनी' मालिकेतही तिने काम केलं आहे.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी रेवती लेले ही एक उत्तम कथ्थक नृत्यांगना देखील आहे.

नुकतंच अभिनेत्रीने पारंपरिक अंदाजात खास फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटसाठी रेवतीने पोपटी रंगाची साडी नेसली आहे.

शिवाय नाकात नथ, मोकळे केस सोडून साजेसा मेकअप करत तिने खास लूक केला आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.