अथांग समुद्र, निळशार पाणी अन्..., 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची पत्नीसह परदेशवारी, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:30 IST2025-03-10T13:23:04+5:302025-03-10T13:30:51+5:30

लग्नाच्या २ महिन्यानंतर किरण गायकवाड पत्नीसह 'या' देशात गेला हनिमूनला; शेअर केले फोटो

'देवमाणूस', 'लागीर झालं' या मालिकांमधून अभिनेता किरण गायकवाड प्रसिद्धीझोतात आला.

या मालिकांच्या माध्यमातून अभिनेता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला.

सध्या किरण त्याच्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त असल्याचा पाहायला मिळतोय.

अगदी दोन महिन्यांपूर्वी १४ डिसेंबरच्या दिवशी किरण गायकवाडने वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.

आता लग्नाच्या दोन महिन्यानंतर हे दोघेही इंडोनेशियामध्ये हनिमूनसाठी गेले आहेत.

सध्या बालीमध्ये किरण आणि वैष्णवी क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत.

"Yeaaaaa Baaaliii...." असं कॅप्शन देत वैष्णवीने त्यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.