लडाखचं नयनरम्य दृश्य अन् गुलाबी साडीत मराठी अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:31 IST2025-05-28T16:21:36+5:302025-05-28T16:31:10+5:30
लडाखचं नयनरम्य दृश्य अन् अभिनेत्रीचं सौंदर्य एकरुप झाल्यासारखं वाटत आहे.

लेह-लडाखमध्ये फिरायला जाणं म्हणजे निसर्गाचा सुखद अनुभव घेणं आहे. तिथले नयनरम्य दृश्य कायम मनात साठवण्यासारखे असतात. मराठी अभिनेत्री सध्या लेह-लडाखमध्ये फिरण्याचा आनंद लुटत आहे.
ही अभिनेत्री आहे सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar). सुखदा आणि अभिजीत दोघंही नवरा बायको लडाखला फिरायला गेले आहेत. त्यांनी तिथले काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.
दरम्यान सुखदाने गुलाबी साडीत खास फोटोशूट केलं आहे. मागे निसर्गाचा सुंदर नजारा दिसतोय तर समोर ती गुलाबी साडीत उभी आहे. पदर वाऱ्यावर उडताना तिने छान पोज दिली आहे.
सुखदाच्या गुलाबी साडीवर फुलांची आकर्षक डिझाईन आहे. यावर तिने पांढरा ब्लाऊज घातला आहे. तसंच साजेशी नाजूक ज्वेलरी परिधान केली आहे. तसंच तिचा मेकअप चेहऱ्यावर आणखी ग्लो आणत आहे.
लडाखमधील एका ठिकाणी झाडाखाली तिने काही फोटो काढले आहेत. झाडावरील टवटवीत फुलं आणि सुखदाचं सौंदर्य एकरुप झालेलं दिसत आहे.
एखाद्या चित्रकाराने कागदावर रेखाटावं असंच हे खरोखरचं दृश्य आहे. सुखदाच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याचं आणि या नजाऱ्याचं कौतुक केलं आहे.