तब्बल १० वर्षांनी 'या' मराठी अभिनेत्रीचं टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक, एकेकाळी सर्वांची लाडकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:09 IST2026-03-20T11:54:04+5:302026-03-20T12:09:46+5:30
मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. परंतु काही कारणास्तव या अभिनेत्रींनी पुढे काम करणं थांबवलं. अशीच एक अभिनेत्री तब्बल १० वर्षांनी मराठी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे.

मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. परंतु काही कारणास्तव या अभिनेत्रींनी पुढे काम करणं थांबवलं. अशीच एक अभिनेत्री तब्बल १० वर्षांनी मराठी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे.

ही अभिनेत्री आहे सोनाली पंडित नाईक. सोनाली पंडितने टीव्ही इंडस्ट्रीतील एक काळ गाजवला आहे. सोनालीची प्रपंच ही मालिका अल्फा मराठीवर चांगलीच गाजली होती.

पुढे सोनालीने हिंदी मालिकांची वाट धरली. मॅडम सर मालिकेत सोनालीने साकारलेली पुष्पा सिंह ही भूमिका प्रचंड गाजली

याशिवाय यहा मैं घर घर खेली, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा, गठबंधन या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये सोनालीने काम केलं. सोनालीला हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत चांगलीच लोकप्रियता मिळाली.

सोनालीने प्रपंच मालिकेत घरच्यांच्या दबावामुळे लग्न करणारी, शिक्षणाची आवड असूनही संसारात रमलेल्या मुलीची भूमिका सुंदरपणे साकारली होती. आजही ही भूमिका दर्दी रसिकांच्या स्मरणात आहे

सोनाली पंडित आता तब्बल १० वर्षांनी मराठी मालिकेत कमबॅक करत आहे. कलर्स मराठीवरील मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी या नव्याने सुरु होणाऱ्या मालिकेत सोनाली झळकणार आहे

मोहिनी आणि कार्तिकीची धाडसी आई शालिनीच्या भूमिकेत सोनाली झळकणार आहे. अनेक वर्षांनी सोनालीला या मालिकेत पाहायला चाहते उत्सुक आहेत

















