पाठमोरी उभी असणाऱ्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? सध्या गाजवतीये हिंदी रिॲलिटी शो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 03:30 PM2024-03-19T15:30:17+5:302024-03-19T16:12:53+5:30

Marathi actress: अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून यातील काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्रीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या या अभिनेत्रीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या अभिनेत्रीने तिचे काही पाठमोरे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ही अभिनेत्री कोण अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो अभिनेत्री श्रेया बुगडे हिचे आहेत.

चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून श्रेया घराघरात पोहोचली. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

श्रेया सध्या एका हिंदी रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. त्यामुळे आता हिंदी प्रेक्षकांचीही मनं ती जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.

श्रेया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे कायम तिच्याविषयीचे अपडेट ती चाहत्यांना देत असते.

अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून यातील काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होतात.