'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 17:54 IST2024-04-27T17:49:37+5:302024-04-27T17:54:00+5:30
Rupali bhosale: खास मालिकेत यशच्या लग्नासाठी रुपालीने हा लूक केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून ती नावारुपाला आली.
'आई कुठे काय करते'मध्ये ग्रे शेड भूमिका साकारुन ती बरीच लोकप्रिय झाली.
आज सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
संजना म्हणून लोकप्रिय असलेल्या रुपालीचा सोशल मीडियावर दांडगा वावर आहे.
रुपाली कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांना देत असते.
नुकतेच तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती सुंदर दिसत आहे.
मोरपिशी रंगाच्या साडीत तिने हे छान फोटोशूट केलं असून तिचा लूक चर्चेत येत आहे.
खास मालिकेत यशच्या लग्नासाठी रुपालीने हा लूक केला आहे.