'जबरदस्त ॲटिट्यूड'; रुचिरा जाधवच्या बॉस लूकवर चाहते फिदा, कमेंटचा पडतोय पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 13:46 IST2024-03-16T13:41:50+5:302024-03-16T13:46:48+5:30

Ruchira jadhav: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव (ruchira jadhav). आजवरच्या कारकिर्दीत रुचिराने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको', 'बिग बॉस मराठी 4' या लोकप्रिय मालिका, कार्यक्रमांमध्येही ती झळकली होती.

रुचिराने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा काही मालिकांमध्येही काम केलं आहे.

रुचिरा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

रुचिराने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

रुचिराने बॉस लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचा हा लूक चर्चेचा विषय ठरत आहे.

रुचिराने वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो क्लिक केले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.