४४व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर मराठी अभिनेत्रीने शेअर केले नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणते- "आज..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 10:10 IST2026-04-10T09:59:14+5:302026-04-10T10:10:30+5:30

लोकप्रिय मराठी अभिनेत्री नंदिता पाटकर हिने ४४व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर नंदिताने नवऱ्यासोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

लोकप्रिय मराठी अभिनेत्री नंदिता पाटकर हिने ४४व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. नंदिताने दिग्दर्शक विपुल महागावकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकत नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे.

लग्नानंतर नंदिताने नवऱ्यासोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोंना तिने छान कॅप्शनही दिलं आहे.

प्रवासापासून ते नॉनस्टॉप चॅटिंगपर्यंत...मोठ्या स्वप्नांपासून ते आज काय खाणार? इथपर्यंत...आपण मिस्टर आणि मिसेस झालो...असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.

नंदिताच्या फोटोंवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

नंदिताने अनेक मालिका, नाटकामंध्ये काम केलं आहे. पण, 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.

तर 'एलिझाबेथ एकादशी' या सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. सध्या नंदिता 'शेवग्याच्या शेंगा' नाटकात काम करत आहे.

नंदिताचा पती विपुल महागावकर मराठी इंडस्ट्रीतलाच आहे. तो नाट्य दिग्दर्शक, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि नाट्य संयोजक आहे.

त्याने १७ पेक्षा जास्त एकांकिकांचं आणि ५ प्रायोगिक नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'पै पैशांची गोष्ट','उद्धवस्त धर्माशाळा','खिडकी' या नाटकासाठी त्याला विशेष ओळख मिळाली.

नंदिताचं हे दुसरं लग्न आहे. इंडस्ट्रीत येण्याआधी तिचं लग्न झालं होतं. मात्र काही कारणांमुळे अभिनेत्रीचा घटस्फोट झाला.