'मन उडू उडू झालं'च्या सानिकाचा ऑस्ट्रेलिया दौरा; कूल लूकमुळे होतीये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 14:17 IST2024-04-11T14:10:04+5:302024-04-11T14:17:17+5:30
Reena madhukar: रीना परदेशवारी करण्यात दंग झाल्याचं तिच्या फोटोवरुन लक्षात येतं.

मन उडू उडू झालं या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रीना मधुकर.
उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर रीनाने मराठी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
मन उडू उडू झालं या मालिकेत रीनाने सानिका ही भूमिका साकारली होती.
रीना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
नवनवीन पोस्ट शेअर करत ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
सध्या रीना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रीनाचा हटके कूल लूक सध्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
रीनाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात काही हिंदी मालिकांचाही समावेश आहे.