Photos: आवर स्वत:ला...; ऑस्ट्रेलियातील बीचवर बोल्ड झाली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, हॉट फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:23 IST2026-03-27T11:18:37+5:302026-03-27T11:23:17+5:30
वनिताने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील तिच्या काही फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.

वनिता खरात ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून वनिता घराघरात पोहोचली.

हास्यजत्रेच्या टीमचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. त्यामुळे वनिताही सध्या ऑस्ट्रेलियात आहे.

वनिताने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील तिच्या काही फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या बीचवर वनिताचा हॉट लूक पाहायला मिळत आहे.

काळ्या रंगाचे शॉर्ट, ब्रा आणि पांढऱ्या रंगाचे शर्ट तिने घातल्याचं दिसत आहे.

वनिताचा हा बोल्ड लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

वनिताचे हे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काहींना वनिताचा हा लूक आवडला आहे.

तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. "अंगप्रदर्शन करण्याची गरज नाही", "आवर स्वत:ला..." अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

वनिताने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. गुलकंद, चिकी चिकी बूबूमबूम, सरला एक कोटी, विकी वेलिंगकर, येरे येरे पैसा ३ या सिनेमांमध्ये ती झळकली.

शाहीद कपूरच्या कबीर सिंग सिनेमामुळे वनिता प्रसिद्धीझोतात आली होती.

















