'हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या बहिणीला पाहिलंय का? दिसते तिच्याइतकीच 'बोल्ड & ब्युटिफूल'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 09:57 PM2023-10-25T21:57:37+5:302023-10-25T22:18:49+5:30

शिवालीची बहिण आहे मॉडेल, तिचेही बोल्ड फोटोशूट चर्चेचा विषय

Shivali Parab Sister Bold Photos: महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शो मधून अभिनेत्री शिवाली परब घराघरांत पोहोचली. पण तुम्ही तिच्या बहिणीला कधी पाहिलंय का?

शिवाली स्वत: दिसायला अतिशय सुंदर आहे. शिवालीची एक वेगळी स्टाईल आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे, शिवालीची बहिणही तिच्या इतकीच सुंदर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

शिवाली परबच्या बहिणचं नाव आहे स्नेहा परब. शिवाली जशी बोल्ड, बिनधास्त आणि सुंदर आहे, अगदी तशीच तिची बहिण स्नेहा देखील बोल्डनेसच्या बाबतीत आघाडीवर आहे.

शिवालीची बहिण स्नेहा ही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खूप अॅक्टीव्ह असते. ती सातत्याने तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

शिवाली आणि स्नेहा या दोघी बहिणींचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्या दोघींमध्ये खूप चांगलं बाँडिंग असल्याचे त्यांच्या इन्स्टा पोस्ट आणि मजेदार रील्समधून नेहमी दिसून येते.

शिवाली आणि स्नेहा या दोघीही दिसायला बऱ्याच एकसारख्या आहेत, अशा आशयाच्या अनेक कमेंट्स त्यांच्या फोटो पोस्टवर सारख्या येताना दिसतात.

शिवाली अभिनेत्री आहे, तर तिची बहीण स्नेहा ही देखील एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचे अनेक बोल्ड फोटोज चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

स्नेहा प्रोफेशनल मॉडेल असून तिने काही ब्रँडसाठी जाहिरातींचे फोटोशूट केले आहे. स्नेहाचे इन्स्टाग्रामवर 19.1k फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो सौजन्य- स्नेहा परब इन्स्टाग्राम)