लॉकडाऊनमधील प्यारवाली लव्हस्टोरी! विनोदाची राणी झाली सुमितची 'नवरी', पाहा त्यांचा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 12:16 PM2023-02-03T12:16:04+5:302023-02-03T13:59:32+5:30

दरम्यान एका मुलाखतीमध्ये सुमित-वनिता यांनी त्यांची हटके लव्ह स्टोरी सांगितली. लॉकडाऊनमध्ये चक्क लुडो खेळता खेळता या दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती.

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा' फेम वनिता खरात लग्नबंधनात अडकली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. (फोटो इन्स्टाग्राम)

मोजक्या पाहुण्याच्या उपस्थित हा विवाह सोहळा थाटात पार पडला. (फोटो इन्स्टाग्राम)

वनिताने लग्नात पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. त्यावर गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्या घेत आपला लूक पूर्ण केला होता. (फोटो इन्स्टाग्राम)

सुमितने शेरवानी परिधान करत त्यावर फेटा बांधला होता. (फोटो इन्स्टाग्राम)

एका मुलाखतीमध्ये सुमित-वनिता यांनी त्यांची हटके लव्ह स्टोरी सांगितली. लॉकडाऊनमध्ये चक्क लुडो खेळता खेळता या दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. (फोटो इन्स्टाग्राम)