Vanita Kharat Wedding : वनिता खरात लवकरच होणार नवरी; पाहा, मेहंदी सोहळ्याचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 03:26 PM2023-01-31T15:26:25+5:302023-01-31T15:36:16+5:30

#su’MEET’vani : सर्वांना खळखळून हसवणारी सर्वांची लाडकी वनी अर्थात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात हिच्या लग्नविधींना सुरूवात झाली आहे.

सर्वांना खळखळून हसवणारी सर्वांची लाडकी वनी अर्थात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात हिच्या लग्नविधींना सुरूवात झाली आहे.

वनिता बॉयफ्रेंड सुमित लोढेंसह २ फ्रेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

वनिताने तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

सुमितने त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी हातावर मेहेंदी काढली. वनीचं नाव त्याने हातावर लिहिलं.

वनिता व सुमितने त्यांच्या लग्नासाठी खास हॅशटॅग तयार केला आहे. “#su’MEET’vani” असा खास हॅशटॅग या जोडप्याने प्रत्येक फोटोखाली दिला आहे.

वनीच्या मेहंदी सोहळ्याला शिवाली परब, चेतना भट्ट यांच्यासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकार हजर होते.

काही दिवसांआधी वनिताने प्री वेडिंग फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फाेटोत दोघंही रोमॅन्टिक पोझ देताना दिसले होते.

वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे.