'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'ची डॅशिंग लेडी! वनिता खरातचा रावडी लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:52 IST2024-01-24T15:42:07+5:302024-01-24T15:52:06+5:30
Vanita kharat: वनिताचा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात.
उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधणारी वनिता आज कोणालाही नवीन नाही.
छोट्या पडद्यावर मुक्तपणे वावर करणारी वनिता अनेक गाजलेल्या सिनेमांमध्येही झळकली आहे.
कबीर सिंग या गाजलेल्या बॉलिवूड सिनेमात ती झळकली आहे.
वनिता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयीचे अनेक अपडेट ती चाहत्यांना देते.
वनिताने अलिकडेच केलेलं एक फोटोशूट चर्चेत येत आहे. या फोटोमध्ये ती डॅशिंग अंदाजात दिसून येत आहे.