"नक्की काय दाखवायचंय?", शिवाली परबचा 'तो' फोटो पाहून चाहत्यांचा संताप, अभिनेत्री होतेय ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:01 IST2025-12-14T14:00:48+5:302025-12-14T17:01:36+5:30
शिवालीने डॅशिंग लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीसही उतरले आहेत. मात्र यातील एका फोटोमुळे अभिनेत्री ट्रोल झाली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून अभिनेत्री शिवाली परब हिला प्रसिद्धी मिळाली. शिवालीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

शिवालीने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शिवालीने पिवळ्या रंगाची साडी, ब्लाऊज आणि त्यावर ब्लेझर असा हटके लूक केल्याचं दिसत आहे. चोकर आणि लाँग नेकलेस अशी ज्वेलरी तिने घातली आहे.

केसांचा बन बांधत डोळ्यांवर गॉगल लावून अभिनेत्रीने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत.

शिवालीने डॅशिंग लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीसही उतरले आहेत.

मात्र यातील एका फोटोमुळे अभिनेत्री ट्रोल झाली आहे. शिवालीने कमरेला गॉगल लावल्याचा फोटो शेअर केला आहे.

यामध्ये फक्त तिची बेंबी दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी शिवालीला ट्रोल केलं आहे.

"चष्मा अयोग्य ठिकाणी आहे का?", "हे चांगलं नाही दिसतेय", "नक्की काय दाखवायचं आहे?" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

शिवालीने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

प्रेम प्रथा धुमशान, मंगला या सिनेमांमध्ये शिवाली मुख्य भूमिका साकारताना दिसली होती.
















