"फूल गुलाब का, लाखों में हजारों में..." 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचा मराठमोळा स्वॅग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 16:47 IST2024-11-16T16:37:07+5:302024-11-16T16:47:32+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात.

विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
वनिताने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
अभिनयासह वनिताचा सोशल मीडियावरही दांडगा वावर आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी, किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतंच तिने पारंपरिक अंदाजात खास फोटोशूट केलं आहे.
तपकिरी रंगाची साडी, गळ्यात तन्मणी हार तसेत केसात गुलाब माळून अभिनेत्रीने फोटो काढलेत.
वनिता खरातचा हा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.