गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:44 IST2025-05-27T18:31:24+5:302025-05-27T18:44:04+5:30

"तुला लग्न करायचंय ना... मग धर्म बदल!" गौहर खानचा होता दबाव, कुशाल टंडनचा खुलासा

मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान आणि कुशल टंडन यांची जोडी प्रेक्षकांची आवडती होती. एकेकाळी दोघांचं एकमेंकावर प्रचंड प्रेम होतं. पण, आता गौहर व कुशाल एकमेकांचं तोंड बघणंही पसंत करत नाही.

गौहर खान आणि कुशल टंडन यांची २०१३ मध्ये पहिल्यांदा 'बिग बॉस'मध्ये भेट झाली होती. 'बिग बॉस' संपल्यानंतरही हे जोडपे एकत्र होतं.

या दोघांची जोडी चाहत्यांचीही लोकप्रिय होती. चाहत्यांनी त्यांना 'गौशाल' असं नाव ठेवलं होतं.

पण, एके दिवशी, कुशलने गौहरपासून वेगळे झाल्याचं ट्विट करून सोशल मीडियावर चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.

परंतु आता त्यांचं वेगळं होण्याचं खरं कारण समोर आलं आहे. गौहरसोबत ब्रेकअपची घोषणा केल्यानंतर कुशलने ब्रेकअप होण्याचं मुख्य कारण धर्म असल्याचं सांगितलं.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ब्रेकअपनंतर दुसऱ्याच दिवशी कुशल टंडनने एका पत्रकार मित्राला नात तुटण्यामागचं कारण सांगितलं होतं.

त्यानुसार, गौहरने कुशलला इस्लाम धर्म स्वीकारण्याची अट घातली होती. कुशल म्हणाला होता, "प्रेम आयुष्यात महत्त्वाचं असलं, तरी तेच सगळं काही नाही".

ब्रेकअपनंतर हे कपल पुन्हा कधीच एकत्र दिसलं नाही. आज दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे सरकले आहेत.

गौहर खानचं लग्न जैद दरबारशी झालंय. ती आता दुसऱ्यांदा प्रेग्नेंट सुद्धा आहे.

तर कुशल आता शिवांगी जोशीला डेट करतोय. परंतु अजूनही दोघांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.