'शकालाका बूमबूम'मधील संजू आठवतोय? आता दिसतो कमालीची हॅण्डसम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 18:45 IST2022-01-10T18:40:54+5:302022-01-10T18:45:56+5:30

Kinshuk vaidya:शकालाका बूमबूम ही मालिका संपून आज बरेच वर्ष झाले आहेत. परंतु, ही मालिका अनेकांच्या लक्षात आहेत. त्यातच या मालिकेतील बालकलाकार आता कसे दिसतात. ते काय करतात असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.

छोट्या पडद्यावर एकेकाळी तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'शकालाका बूमबूम' या मालिकेत संजूकडे असलेली जादूची पेन्सिल आपल्याकडेही असावी असं प्रत्येक लहान मुलाला वाटायचं.

ही मालिका त्या काळी तुफान गाजली होती. या मालिकेत बालकलाकार किंशुक वैद्य याने संजूची भूमिका साकारली होती.

शकालाका बूमबूम ही मालिका संपून आज बरेच वर्ष झाले आहेत. परंतु, ही मालिका अनेकांच्या लक्षात आहेत. त्यातच या मालिकेतील बालकलाकार आता कसे दिसतात. ते काय करतात असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. म्हणूनच, या मालिकेतील संजूविषयी जाणून घेऊयात.

संजू म्हणजे किंशुक वैद्य याने बॅचलर ऑफ मास मीडियाची डिग्री घेतली आहे. तसंच त्याने अॅडव्हरटायझिंगमध्ये स्पेशलायजेशनही केल्याचं सांगण्यात येतं.

शकालाका बूमबूमनंतर किंशुकला अनेक मालिकांच्या ऑफर्स आल्या होत्या. परंतु, त्याने काही काळासाठी कलाविश्वापासून फारकत घेतली.

शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो कलाविश्वापासून दूर होता. ही मालिका संपल्यानंतर जवळपास १० वर्षांनी तो 'एक रिश्ता साझेदारी का' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

किंशुक अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकला आहे.

करिअरसोबतच किंशुक त्याच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असतो. किंशूक अभिनेत्री शिव्या पठानियाला डेट करत असल्याचं म्हटलं जातं.

आज किंशुक अनेक मुलींच्या गळ्यातील ताईत असल्याचं पाहायला मिळतं.

किंशुक सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा त्याचे फोटो शेअर करत असतो.