सौंदर्याच्या बाबतीत मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते ही २१ वर्षांची अभिनेत्री, आहे कोटींची मालकिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:11 IST2025-02-03T16:56:43+5:302025-02-03T17:11:03+5:30

इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या अभिनेत्रीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

सौंदर्याच्या बाबतीत मोठ्या अभिनेत्रींना टक्क देणारी ही अभिनेत्री आहे 'बिग बॉस' फेम ईशा मालवीय (Isha Malviya).

ईशा सध्या २१ वर्षांची आहे, पण तिचा स्टायलिश अवतार पाहून कोणीही आश्चर्यचकित होईल.

तिने खूप कमी वयात टीव्ही इंडस्ट्रीत खूप नाव कमावलं आहे. फक्त नावचं नाही तर पैसाही भरपूर कमावला आहे.

तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे ७ ते १० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

ईशानं 'उडारिया' या टीव्ही शोद्वारे घराघरात ओळख निर्माण केली होती. त्यानंतर ती 'बिग बॉस १७'मध्ये सहभागी झाली होती.

यासोबतच तिचे अनेक म्युझिक व्हिडीओही आले आहेत. काही जाहिरातीही ती करते.

इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या ईशाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

ईशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटोशूट आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

या फोटोत ती कोणत्याही मोठ्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झालेत.

मध्य प्रदेशातील होशंगाबादमध्ये जन्मलेल्या ईशानं कधीही अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिलं नव्हतं. तिला पायलट व्हायचं होतं.