रिअल लाइफमध्येही झालंय शिवाचं लग्न; तुम्हाला माहितीये का कोण आहे तिचा नवरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 16:39 IST2024-06-17T16:31:50+5:302024-06-17T16:39:00+5:30

Purva kaushik: या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने शिवाची भूमिका साकारली असून तिचा नवरादेखील मराठी कलाविश्वात कार्यरत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे शिवा. अलिकडेच सुरु झालेल्या या मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे.

अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि शाल्व किंजवडेकर यांनी या मालिकेत मुख्य़ भूमिका साकारली आहे.

नुकतंच या मालिकेत शिवा आणि आशुचं लग्न झालं आहे. त्यामुळे ही मालिका मालिकेत येणाऱ्या चढउतारांमुळे चर्चेत आहे.

या मालिकेत शिवा आणि आशुचं लग्न झाल्यामुळे शिवाचा रिअल लाइफ पार्टनर कोण आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहेत.

या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने शिवाची भूमिका साकारली असून तिचा नवरादेखील मराठी कलाविश्वात कार्यरत आहे.

पूर्वाने प्रकाशयोजनाकार अमोघ फडके याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

अमोघने आतापर्यंत अनेक नाटकांसाठी प्रकाशयोजनाकार म्हणून काम केलं असून त्याला पुरस्कारही मिळाले आहेत.

अमोघ सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा तो पूर्वासोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.