"मी बिघडलेली मुलगी, वयाच्या १७ व्या वर्षी विधवा व्हावं हे आईला नको होतं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 19:45 IST2025-01-06T19:40:15+5:302025-01-06T19:45:14+5:30

एका इंटरव्ह्यूमध्ये अभिनेत्रीने तिचा अनुभव कसा होता याबाबत सांगितलं आहे.

ईशा सिंह ही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चांगली खेळत आहे. ती २६ वर्षांची आहे पण ती १७ वर्षांची असल्यापासून टीव्हीवर काम करत आहे.

इश्क का रंग सफेद या सीरियलमध्ये तिने वयाच्या १७ व्या वर्षी एका विधवेचा रोल केला होता. तिच्या या रोलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

ईशाने एका इंटरव्ह्यूमध्ये तिचा त्यावेळचा अनुभव कसा होता याबाबत सांगितलं आहे. ती लहान असताना तिने हा रोल केला होता.

विधवेचा रोल करावा हे तिच्या आईला नको होतं. पण ईशाला आव्हानात्मक काम करायचं होतं. म्हणून तिने ही ऑडिशन दिली.

इश्क का रंग सफेदच्या आधी तिने जॉन अब्राहमच्या एका चित्रपटात एक छोटासा रोल केला होता. पण तो चित्रपट प्रदर्शितच झाला नाही असं सांगितलं.

ईशाला कामासोबत शिक्षण देखील मॅनेज करायचं होतं. ती तेव्हा अकरावीत होती आणि तिची परीक्षा होती.

"या कामासाठी मला कोणीच फोर्स केलं नाही. मी हे माझ्या मर्जीने केलं. ही रडणारी विधवा नाही."

"मी बिघडलेली मुलगी आहे. आई-वडील कधीच ओरडले नाहीत" असं ईशाने म्हटलं आहे.

विधवांचं आयुष्य जाणून घेण्यासाठी ईशा अनेक विधवा आश्रममध्ये गेली. ईशा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.