देवोलीना भट्टाचार्जी आणि विशाल सिंगच्या साखरपुड्यामागचं सत्य अखेर आलं समोर, त्यांनीच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:41 PM2022-02-03T16:41:30+5:302022-02-03T16:41:30+5:30

टेलिव्हिजनवरील गोपी बहु देवोलीन भट्टाचार्जीने आता तिचा ऑनस्क्रीन दीर विशाल सिंगसोबत साखरपुडा करून सर्वांना चकीत केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

मात्र देवोलिना आणि विशालने आणखी एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना मस्करी केल्याचे सांगितले. (फोटो: इंस्टाग्राम)

दोघांनी इंस्टाग्राम हॅण्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सांगितले की, ते एका म्युझिक व्हिडीओचा हिस्सा बनणार आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

देवोलिना आणि विशालने पुढे सांगितले की, जेव्हा असे काही होईल, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही फक्त चांगले फ्रेंड आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेता विशाल सिंगने इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करून माहिती दिली. ज्यात देवोलिना तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

देवोलिना बिग बॉस १५ची स्पर्धक होती, जिथे तिला टास्क दरम्यान दुखापत झाली. (फोटो: इंस्टाग्राम)

देवोलिना आणि विशाल एकत्र साथ निभाना साथियामध्ये एकत्र झळकले आहेत. यात देवोलिनाने गोपी बहू आणि विशालने तिच्या दीराची भूमिका केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)