दौलत अन् शेफालीमध्ये आहे खास नातं; तुम्हाला माहितीये का त्यांचं फॅमिली रिलेशन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 13:55 IST2022-01-28T13:50:22+5:302022-01-28T13:55:08+5:30
Tv actors: शेफाली आणि दौलत या दोघांचं फॅमेली रिलेशन काय आहे ते पाहुयात.

छोट्या पडद्यावर गाजलेल्या दोन लोकप्रिय मालिका म्हणजे 'सुंदरा मनामध्ये भरली आणि माझी तुझी रेशीमगाठ'.
या दोन्ही मालिकांमध्ये कथानकासोबतच त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.
त्यामुळेच आज या दोन्ही मालिकांमधील शेफाली आणि दौलत या दोघांचं फॅमेली रिलेशन काय आहे ते पाहुयात.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेत्री काजल काटे हिने शेफालीची भूमिका साकारली आहे.
तर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेता हृषिकेश शेलार याने दौलतची भूमिका साकारली आहे.
विशेष म्हणजे हृषिकेश आणि काजल यांच्यात कौटुंबिक नातं असून हृषिकेशच्या पत्नीमुळे हे नातं निर्माण झालं आहे.
हृषिकेशची पत्नीदेखील त्याच्याप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री आहे.
हृषिकेशच्या पत्नीचं नाव स्नेहा असून ती शेफालीची म्हणजेच अभिनेत्री काजल काटेची सख्खी बहीण आहे.
काजल, स्नेहाची धाकटी बहिण आहे.
स्नेहा आणि काजल बहिणी असल्यामुळे काजल ही हृषिकेशची मेहुणी लागते.
स्नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती काजल आणि हृषिकेशसोबतचे फोटो शेअर करत असते.