लग्नानंतर ४ वर्षांतच घेतला घटस्फोट, २ वर्षांची मुलगी होती पदरात; आता Ex नवऱ्यालाच डेट करतेय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:05 IST2025-09-15T12:00:00+5:302025-09-15T12:05:04+5:30

सिनेसृष्टीतील घटस्फोट हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. एका टीव्ही अभिनेत्रीनेही लग्नानंतर ४ वर्षांतच घटस्फोट घेतला होता. मात्र आता अभिनेत्री आपल्या ex नवऱ्यालाच डेट करत आहे.

सिनेसृष्टीतील घटस्फोट हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. एका टीव्ही अभिनेत्रीनेही लग्नानंतर ४ वर्षांतच घटस्फोट घेतला होता.

मात्र आता अभिनेत्री आपल्या ex नवऱ्यालाच डेट करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून चारू असोपा आहे.

चारू असोपा आणि राजीव सेन पुन्हा एकत्र आले आहेत. गणपतीतही ते एकत्र दिसले होते.

त्यानंतर आता लेकीसह ते बँकॉकमध्ये फॅमिली व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. विशेष म्हणजे चारू असोपा आणि राजीव सेन डेट नाइटला गेले होते.

याचे फोटो राजीव सेनने शेअर केले आहेत. घटस्फोटानंतर ते पुन्हा एकत्र आल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

चारू असोपा आणि राजीव सेन यांनी २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नांतर दोन वर्षांनी चारू असोपाने त्यांच्या लेकीला जन्म दिला.

पण, त्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्यामुळे २०२३ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले होते. चारू असोपा तिच्या लेकीसह वेगळी राहत होती.

घटस्फोटानंतर चारू असोपाने राजीव सेनवर अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र आता पुन्हा ते एकत्र आल्याने या दोघांचं नक्की काय सुरू आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.