कुठे गेली 'चला हवा येऊ द्या'ची मंडळी? आता काय करतात भाऊ, श्रेया, सागर, कुशल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:32 IST2025-07-04T17:23:49+5:302025-07-04T17:32:31+5:30
'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात यातील काही चेहरे दिसणार नाहीत. पण, हे कलाकार आता काय करतात हे तुम्हाला माहितीये का?

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोचं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमधूनच अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली होती.
श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे हे नवोदित कलाकार 'चला हवा येऊ द्या'मुळे घराघरात पोहोचले होते. याच शोमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.
'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात यातील काही चेहरे दिसणार नाहीत. पण, हे कलाकार आता काय करतात हे तुम्हाला माहितीये का?
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे 'चला हवा येऊ द्या' शो संपल्यानंतर ड्रामा ज्युनियर्सचं सूत्रसंचालन करताना दिसली. आता ती नव्या पर्वातून पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे.
श्रेयासोबतच कुशल बद्रिकेही 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात दिसणार आहे.
'चला हवा येऊ द्या'च्या पर्वात भारत गणेशपुरेदेखील पाहायला मिळणार आहे.
सागर कारंडेने 'चला हवा येऊ द्या'मधूनच लोकप्रियता मिळाली. हा शो संपल्यानंतर तो जाऊबाई गावातमध्ये दिसला होता. पण नव्या पर्वाच्या प्रोमोमध्ये तो दिसला नाही.
सर्वांचा लाडका भाऊ कदम 'चला हवा येऊ द्या'मधूनच घराघरात पोहोचला. पण, नव्या सीझनमध्ये तो दिसणार नाहीये.
भाऊ कदम सध्या निलेश साबळेसोबत सिनेमा करत आहे. ज्याच्या शूटिंगमध्ये तो बिझी आहे.