व्हॅलेंटाइन डेला निलेश साबळेच्या पत्नीने शेअर केला रोमॅण्टिक फोटो; तुम्ही पाहिलंय का त्याच्या बायकोला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 05:48 PM2024-02-14T17:48:39+5:302024-02-14T17:57:24+5:30

Nilesh sable: निलेशची पत्नी कलाविश्वापासून कोसोदूर आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. आजवर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे.

या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, सध्या नेटकऱ्यांमध्ये कार्यक्रमाचा सूत्रसंचालक निलेश साबळे याची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाद्वारे निलेशने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या कार्यक्रमाचे विजेतेपद त्याने मिळवले होते.

नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटात देखील त्याने काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे.

सध्या सोशल मीडियावर निलेशच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. त्याच्या बायकोने त्याच्यासोबत एक छानसा फोटो शेअर करत त्याला व्हॅलेंटाइन डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

निलेशच्या पत्नीचं नाव गौरी सहस्त्रबुद्धे-साबळे असं आहे. ती सुद्धा निलेशप्रमाणेच आयुर्वेदिक डॉक्टर आहे.

निलेश आणि गौरीचं लव्हमॅरेज आहे. गौरी कलाविश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रीय आहे.

गौरीने निलेशला प्रत्येक संकट काळात साथ दिली आहे. आज त्यांच्या लग्नाला १५ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे.

निलेश, होम मिनिस्टर, फू बाई फू या रिएलिटी शोजमध्ये तो झळकला. याशिवाय नवरा माझा भवरा, बुद्धीबळ, एक मोहर अबोल या चित्रपटातही त्याने काम केलं आहे.