Bigg Boss 16 Grand Finale: आज ‘ब‍िग बॉस १६’ची फायनल, BBचे आजवरचे विजेते कोण आहेत? वाचा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 05:28 PM2023-02-12T17:28:41+5:302023-02-12T17:55:28+5:30

Bigg Boss 16 Grand Finale: आज बिग बॉस १६ची फायनल...पण या शोच्या आत्तापर्यंतच्या सीझनचे विजेते कोण आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

२००६ साली बिग बॉसचा पहिला सीझन रंगला होता. बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय हा पहिल्या सीझनचा विजेता होता. बिग बॉसची ट्रॉफी आणि १ कोटींची रोख रक्कम त्याला बक्षिस म्हणून मिळाली होती. अर्शद वारसीने बिग बॉसचा पहिला सीझन होस्ट केला होता.

बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचा विजेता होता आशुतोष कौशिक. बिग बॉसची ट्रॉफी आणि १ कोटी रूपये प्राईज मनी त्याने जिंकला होता. हा सीझन शिल्पा शेट्टीने होस्ट केला होता.

बिंदू दारा सिंह हा बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनचा विजेता होता, त्यालाही बिग बॉसची ट्रॉफी आणि १ कोटी रक्कम असं बक्षिस मिळालं होतं, हा सीझन अमिताभ बच्चन यांनी होस्ट केला होता..

बिग बॉसचा चौथा सीझन श्वेता तिवारीने जिंकला होता. तिलाही प्राईज मनी म्हणून १ कोटी रूपये मिळाले होते. सीझन ४ पहिल्यांदा सलमान खानने होस्ट केला होता.

बिग बॉसच्या पाचव्या सीझनची विजेती जुही परमार होती. १ कोटींचं बक्षिस तिने जिंकलं होतं, हा सीझन संजय दत्त व सलमान खानने होस्ट केला होता.

कसौटी जिंदगी की या मालिकेतील कोमोलिका अर्थात उर्वशी ढोलकिया ही बिग बॉस ६ ची विजेती होती. बिग बॉसची ट्रॉफी आणि ५० लाख रोख तिला इनामापोटी मिळाले होते.

बिग बॉसचा सातवा सीझन गौहर खानने जिंकला होता. बिग बॉसची ट्रॉफी आणि ४० लाख रूपये तिने जिंकले होते. तनिषा या सीझनची रनरअप होती.

दीया और बाती फेम अभिनेता गौतम गुलाटी बिग बॉसच्या आठव्या सीझनचा विजेता होता. ट्रॉफी आणि ५० लाख त्याने जिंकले होते.

बिग बॉसचा नववा सीझन प्रिन्स नरूलाने जिंकला होता. त्याला ३५ लाख रोख व ट्रॉफी असं बक्षिस मिळालं होतं.

मनवीर गुर्जर हा बिग बॉस १० चा विजेता होता. त्याला पुरस्कारापोटी ट्रॉफी व ४० लाख मिळाले होते. विशेष म्हणजे, यापैकी २० लाख रूपये मनवीरने सलमानच्या बीईंग ह्युमन या चॅरिटेबल संस्थेला दान केले होते.

बिग बॉसचा ११ वा सीझन 'भाभीजी घर पर हैं' फेम शिल्पा शिंदेने जिंकला होता. हिना खानला हरवत तिने हा सीझन आपल्या नावावर केला होता.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली दीपिका कक्कड हिने बिग बॉसचा १२ वा सीझन जिंकला होता. तिला पुरस्कारापोटी ट्रॉफी व ३० लाखांची रोख रक्कम मिळाली होती.

बिग बॉसचा १३ वा सीझन सिद्धार्थ शुक्लाने जिंकला होता. ट्रॉफी व ४० लाख जिंकणार्या सिद्धार्थने हा सीझन चांगलाच गाजवला होता. दुर्दैवाने आज सिद्धार्थ आपल्यात नाही.

बिग बॉसचा १४ वा सीझन रूबीना दिलैकने जिंकला होता. बिग बॉसची ट्रॉफी व ३६ लाख रूपये तिने जिंकले होते.

गेल्यावर्षीचा बिग बॉसचा १५ वा सीझन अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने जिंकला होता. बिग बॉसची चकाकती ट्रॉफी आणि ४० लाखांची रक्कम तिला बक्षिसरूपात मिळाली होती.