'बिग बॉस मराठी ६'मध्ये येतेय 'ही' ग्लॅमरस अभिनेत्री, तिच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची तुफान चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:19 IST2026-02-28T13:16:20+5:302026-02-28T14:19:24+5:30
अनुश्री, तन्वी अन् रुचिताला टक्कर द्यायला येतीये हिंदी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री

'बिग बॉस मराठी'चे सहावे पर्व सध्या रंजक वळणावर आहे. सहा आठवड्यांचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर आता सातव्या आठवड्यात घरातील समीकरणं बदलताना दिसत आहेत.

आतापर्यंत सोनाली राऊत, ओंकार राऊत, करण सोनावणे, आयुष संजीव आणि सचिन कुमावत या सदस्यांना घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेल्या राखी सावंतने घरात पाऊल ठेवल्यापासून मनोरंजनाचा धुमाकूळ घातला. दरम्यान आता आणखी एका नवीन सदस्याच्या एन्ट्रीची चर्चा रंगली आहे.

राखीच्या एन्ट्रीनंतर आता 'बिग बॉस मराठी ६'मध्ये दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. 'टेलीचक्कर' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री रेवा कौरसे लवकरच या शोमध्ये सहभागी होऊ शकते.

रेवा कौरसे ही 'दीवानियत','प्या का पहला अध्याय:शिव शक्ती' या शोजमध्ये दिसली होती. ग्लॅमरस अभिनेत्री अशी प्रतिमा आहे. आता ती बिग बॉसमध्ये नशीब आजमावणार आहे.

रेवचा जन्म नागपूरमध्ये झाला. २०२१ साली रेवा 'सीता मनोहर श्री राघवा' या तेलुगू सिनेमात दिसली होती. यानंतर तिने दोन मालिका केल्या.

पुढील भाऊच्या धक्क्यानंतर तिची घरात एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. मात्र कलर्स मराठी वाहिनी किंवा बिग बॉसच्या टीमने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

















