'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारुकी आहे 'इतक्या' कोटींचा मालक; एका कॉमेडी शोसाठी घेतो लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 02:05 PM2024-01-29T14:05:51+5:302024-01-29T14:22:06+5:30

Bigg Boss 17 : मुनव्वर फारुकी जगतो लक्झरियस आयुष्य, महागड्या कार अन् कोट्यवधींचा मालक

'बिग बॉस १७'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. कॉमेडियन मुनव्वर फारुकीने 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं.

'बिग बॉस १७'चा विजेता ठरल्यानंतर मुनव्वर चर्चेत आला आहे. 'बिग बॉस'आधी कंगना रणौतच्या 'लॉक अप' या रिएलिटी शोमध्ये तो सहभागी झाला होता.

'लॉक अप'च्या पहिल्या सीझनचा मुनव्वर फारुकी विजेता ठरला होता. त्यानंतर आता 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवरही त्याने नाव कोरलं.

'बिग बॉस १७'साठी सर्वाधिक फी घेणाऱ्या स्पर्धकांपैकी मुनव्वर एक होता. मुनव्वर हा लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याच्या कॉमेडी शोसाठी चाहते गर्दी करताना दिसतात.

२०२०मध्ये 'दाऊद, यमराज और औरत' या स्टँडअप कॉमेडीमुळे मुनव्वर चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच्या कॉमेडी शोला गर्दी होऊ लागली.

कंगनाच्या 'लॉक अप'मुळे मुनव्वर प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर 'बिग बॉस १७'मुळे त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

कॉमेडियन म्हणून नावारुपाला आलेला मुनव्वर लक्झरियस आयुष्य जगतो. तो महागड्या गाड्यांचा शौकिन आहे. त्याच्याकडे KTM RC200 ही बाईक आहे.

८.८६ लाखांची मारुती सुझुकी आणि टोयोटा फॉर्च्युनरही त्याच्याकडे आहे. आता बिग बॉस १७चा विजेता ठरल्यानंतर त्याला ह्युंडाई क्रेटा ही महागडी कार बक्षीस म्हणून मिळाली आहे.

'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरणारा मुनव्वर जवळपास ८ कोटी रुपयांचा मालक आहे.

एका कॉमेडी शोसाठी मुनव्वर तब्बल १.५ लाख ते २.५ लाख रुपये मानधन घेतो.

मुनव्वरने २०१७मध्ये जास्मिनशी लग्नगाठ बांधली होती. पण, अवघ्या ५ वर्षांतच त्यांचा संसार मोडला. २०२२मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.

मुनव्वरला ५ वर्षांचा मुलगाही आहे. जास्मिनशी घटस्फोट घेतल्यानंतर मुनव्वर अनेक मुलींबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा एक्स गर्लफ्रेंड आयेशा खानने केला होता.