अंगूरी भाभीने पतीसोबतचा 19 वर्षांचा संसार मोडला?, अभिनेत्री सांगितलं सत्य; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 06:36 PM2023-03-16T18:36:38+5:302023-03-16T19:03:00+5:30

१९ वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला? हे कळायला मार्ग नव्हता. अखेर अभिनेत्रीनेच यावर मौन सोडलं आहे.

'भाभी जी घर पर हैं' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रे (Bhabi Ji Ghar Par Hai Shubhangi Atre) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्य खूप चढ-उतारांमधून जाते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

भाबीजी घर पर हैं’ फेम शुभांगी अत्रे लग्नाच्या 19 वर्षांनंतर पती पीयूष पुरीपासून विभक्त झाली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, हा निर्णय घेणे तिच्यासाठी सोपे नव्हता.(फोटो इन्स्टाग्राम)

पिंकविलाशी बोलताना शुभांगी म्हणाली, 'जेव्हाही मी अंगूरी भाभीच्या गेटअपमध्ये असते तेव्हा मी सर्व काही विसरते... अंगूरी भाभीच्या गेटअपमध्ये येताच माझ्या डोक्यात फक्त भूमिका असते. (फोटो इन्स्टाग्राम)

शुभांगीने हे देखील शेअर केले की जेव्हा ती इंडस्ट्रीत नवीन होती, तेव्हा तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागला आणि हे करत असताना तिच्या कामावर परिणाम होऊ न देण्याचे आव्हान तिच्यासमोर होते. पण कालांतराने ती यादोघांमध्ये समतोल राखायला शिकली. (फोटो इन्स्टाग्राम)

शुभांगी अत्रे आणि पियुष गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत होते. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे. जी आता 18 वर्षांची झाली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

शुभांगीने एका मुलाखतीत सांगितले की, “आम्ही एक वर्ष एकत्र राहत नाही. पियुष आणि मी आमचे लग्न शेवटपर्यंत वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. परस्पर आदर, विश्वास आणि मैत्री हा मजबूत लग्नाचा पाया आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

शुभांगी पुढे म्हणाली की, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक समस्या होत्या, ज्या ते सोडवू शकले नाहीत. अभिनेत्री म्हणाली, “आम्हाला समजले की आम्ही आमचे मतभेद सोडवू शकत नाही. त्यामुळे आम्ही एकमेकांना स्पेस देण्याचे ठरवले.(फोटो इन्स्टाग्राम)

''आमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित केले. माझं कुटुंब हे माझं पहिले प्राधान्य होते आणि आमचं कुटुंब आमच्या सभोवताली असावे अशी आमची इच्छा आहे, परंतु काही झालेलं नुकसान तुम्ही भरुन नाही काढू शकत.'' (फोटो इन्स्टाग्राम)

शुभांगी आणि पियुषचा प्रेमविवाह झाला होता. घरच्यांपासून लपून दोघांनी आधी कोर्ट मॅरेज केलं होतं. मात्र, नंतर पियुषसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने तिची कुटुंबाशी ओळख करून दिली.(फोटो इन्स्टाग्राम)