समुद्र किनाऱ्यावर शिवाली परबचं सुरेख फोटोशूट; साडीतील सिंपल लूकची होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 16:29 IST2024-02-16T16:24:41+5:302024-02-16T16:29:51+5:30

Shivali parab: शिवाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

कल्याणची चुलबूली म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तिने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये काम तिच्या नावाची चर्चा रंगते.

शिवाली सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे कायम ती नेटकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

शिवालीने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती समुद्र किनारी फेरफटका मारताना दिसत आहे.

शिवालीने छान साडी नेसून हे फोटोशूट केलं आहे. त्यामुळे तिच्या साधेपणाचं नेटकरी कौतुक करत आहेत.

या फोटोमधील शिवालीच्या स्माइलवर अनेक तरुण घायाळ झाले असून त्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

अलिकडेच शिवालीचं मासोळी ठुमकेवाली हे गाणं रिलीज झालं होतं.