मायबापा विठ्ठला...! 'पारू' फेम शरयू सोनावणेने पतीसह घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 17:25 IST2025-07-06T17:15:57+5:302025-07-06T17:25:44+5:30
आज आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालं आहे.

'पिकींचा विजय असो', 'पारू' या मालिकांमधून शरयू सोनावणे हे नाव घराघरात पोहोचलं आहे. याचनिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात यावेळी वारकरी भक्त आपल्या विठू माउलीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात.
सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटी मंडळीही या सोहळ्याला उपस्थिती लावतात. अशातच अभिनेत्री शरयू सोनावणे आषाढी एकादशीच्या भक्तीमय वातावरणात सहकुटुंब सहभागी झाली.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
सध्या शरयू सोनावणे ही पंढरपुरला पोहोचली आहे. नुकतेच अभिनेत्रीने पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलं आहे.
"आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! "विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला...", असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या फोटोंना दिलं आहे.
शरयूने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर उत्सवाचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले.