अभिनेता अक्षय केळकरचा वेडिंग अल्बम आला समोर, पाहा त्याच्या लग्नातील Unseen फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:13 IST2025-05-14T17:00:30+5:302025-05-14T17:13:44+5:30
अक्षयने त्यांच्या लग्नातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अभिनेता अक्षय केळकर आणि साधना काकतकर हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत.
९ मे २०२५ रोजी अक्षय आणि साधना या दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतली.
अनेक मराठी कलाकारांनी (Marathi Celebrities) अक्षय व साधनाच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती.
नुकतंच अक्षयने त्यांच्या लग्नातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो (Akshay Kelkar and Sadhana Kakatkar Wedding Photos) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये दिसतंय की अक्षयने पांढऱ्या रंगाचे धोतर परिधान करत मरुन रंगाचे वेलवेट उपरणे घेतले होते.
तर सोनेरी रंगाच्या साडीत सुंदर असे दागिने घातलेली साधनाही खूप सुंदर दिसत होती.
या फोटोंमध्ये अक्षय आणि साधना एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत.
तर या फोटोंमध्ये साधनाचा भाऊ हा अक्षयचा कानपिळताना दिसतोय.
अक्षय केळकर आणि साधना हे जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. १० वर्षांच्या रिलेशनशिप दोघांनी 'सात जन्मांचं वचन' घेत नव्या आयुष्याची सुरुवात केली.
अक्षय केळकर हा प्रसिद्ध अभिनेता असून कलर्स मराठीवरच्या 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा तो महाविजेता होता