करिअरच्या शिखरावर असताना वडिलांचं निधन झालं, नैराश्यात अभिनेत्रीने घेतला 'हा' मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 13:03 IST2025-08-18T12:36:46+5:302025-08-18T13:03:28+5:30

एक अशी अभिनेत्री जी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. परंतु तिच्या वडिलांचं निधन झाल्याने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. त्यामुळे अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला

एक अभिनेत्री करिअरच्या शिखरावर होती. अशातच अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे नैराश्यात अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला. कोण होती ती अभिनेत्री

या अभिनेत्रीचं नाव आहे रतन राजपूत. “अगले जनम मोहे बिटिया ही कीजो” या मालिकेतल्या ‘लाली’ या भूमिकेमुळे रतन राजपूत घराघरात पोहोचली.

२०१८ मध्ये रतनच्या वडिलांचे अचानक निधन झाले आणि त्यामुळे ती खूप खचली. त्या काळात ती नैराश्यात गेली आणि तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील गोंधळापासून दूर जाण्यासाठी रतनने काही काळ गावात वास्तव्य केलं. तिथे तिने प्रत्यक्ष शेतात काम केलं. साधारण तीन महिने शेती करताना तिला एक वेगळीच शांतता मिळाली. तिच्या मते या अनुभवामुळे तिला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.

काही दिवसांनी रतनला आरोग्याशी संबंधित काही अडचणींना सामोरं जावं लागलं. तिला ऑटो-इम्यून नावाचा आजार झाला. या आजारामुळे रतनला प्रकाश याशिवाय उजेडात जाणं कठीण झालं.

या कारणामुळे रतनने अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला आणि तिने दुसऱ्या मार्गांचा शोध घेतला. या सगळ्यांनंतर रतन अध्यात्माकडे वळली. तिने आध्यात्मिक प्रवास सुरू केला.

सध्या रतन तिच्या व्हिडीओ आणि व्लॉगद्वारे अध्यात्मासंबंधी विविध संदेश तिच्या चाहत्यांना देत असते. आता रतन पुन्हा अभिनयक्षेत्रात परतण्याची आशा धुसर झाली आहे.