"मला तशाच भूमिका यायला लागल्या..."; गौरव मोरेने सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:06 IST2026-02-04T11:23:14+5:302026-02-04T12:06:54+5:30
गौरव मोरे हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणारा एक लोकप्रिय अभिनेता. काही वर्षांपूर्वी गौरवने 'हास्यजत्रे'ला रामराम ठोकला आणि वेगळ्या वाटा निवडल्या. नुकत्याच एका मुलाखतीत गौरवने 'हास्यजत्रा' सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

गौरव मोरे हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणारा एक लोकप्रिय अभिनेता. काही वर्षांपूर्वी गौरवने 'हास्यजत्रे'ला रामराम ठोकला आणि वेगळ्या वाटा निवडल्या. नुकत्याच एका मुलाखतीत गौरवने 'हास्यजत्रा' सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

9 माईंड्स क्रिएशनला दिलेल्या मुलाखतीत गौरवने हा खुलासा केला. गौरव म्हणाला, ''समोरुन ते म्हणाले, तुमचं काम त्या शो सारखंच होतंय. मग मला भूमिकाही तशाच यायला लागल्या.''

गौरवने पुढे त्याला भूमिका कशा मिळाल्या, हेही सांगितलं. तो म्हणाला, ''तुम्ही येता, कॉमेडी होते आणि मग तुम्ही खूप कॉमेडी करता, असं सांगितलं जायचं.''

''हिरो तिकडे असतो, हिरोईन तिकडे असते आणि त्याच्यामध्ये तुमची भूमिका आहे. दोघांच्या कुटुंबाचा प्रॉब्लेम होतो. मग तुम्ही मध्येमध्ये येता सर, खूप कॉमेडी होते. अशी तुमची भूमिका आहे, आता हे ऐकल्यावर मी काय करायला पाहिजे.'', असं गौरव म्हणाला.

गौरव शेवटी म्हणाला, ''सगळं तेच तेच व्हायला लागलं असं झालं माला. त्यामुळे मला वाटलं की थोडासा आपण ब्रेक घेतला पाहिजे. मध्ये वर्षभर मी कुठेच नव्हतो. 'मॅडनेस मचाएंगे' शोचे मी ३ महिने एपिसोड केले.''

अशाप्रकारे गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो का सोडला, हे सांगितलंं. विनोदी शोमध्ये काम केल्याने भूमिकाही तशाच येत गेल्या, हे यामागचं कारण समजतंय.

सध्या गौरव मोरे सिनेमांमध्ये झळकत आहे. अलीकडच्या काळात त्याने हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन लोकांचं मनोरंजन केलं.

















