एकेकाळी गोठ्यात राहत होती 'ही' अभिनेत्री; 'आई कुठे काय'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 02:47 PM2023-04-24T14:47:56+5:302023-04-24T14:54:34+5:30

Marathi actress: गोठ्याच्या भिंतीला मोठी छिद्र असल्यामुळे ही अभिनेत्री पहाटे तीन वाजता उठून अंघोळ करायची

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'.

या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

कलाविश्वात रुपालीने तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, तिने बराच मोठा स्ट्रगल केला आहे.

एकेकाळी रुपाली आणि तिच्या कुटुंबीयांनी चक्क गोठ्यात आश्रय घेतला होता.

स्वप्नील जोशीच्या शेअर विथ स्वप्नील या रेडिओ कार्यक्रमात तिने तिच्या स्ट्रगलविषयी भाष्य केलं.

रुपालीचं बालपण बीबीडी चाळीत गेलं.मात्र, काकांच्या सांगण्यावरुन रुपालीच्या वडिलांनी एका स्कीममध्ये आयुष्याची जमापुंजी गुंतवली. मात्र, ती स्कीम खोटी निघाली. परिणामी, रुपालीच्या काकाला अटक झाली आणि रुपालीचे वडील मात्र, कुटुंबासह रस्त्यावर आले.

घर गेल्यामुळे रुपाली आणि तिच्या कुटुंबियांनी भर पावसात फिरावं लागलं. त्यावेळी दोन वेळच्या जेवणाचे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. याच काळात तिच्या आईला दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला.

या परिस्थितीमध्ये रुपालीच्या वडिलांच्या एका मित्राने त्यांना मदत केली. या मित्राने त्यांना राहण्यासाठी एक जुनी पत्र्याची खोली दिली. या खोलीमध्ये पूर्वी गुरे बांधली जात होती.

या गोठ्यात रुपाली आणि तिचे कुटुंबीय राहू लागले. या गोठ्याच्या भिंतींना मोठी छिद्र असल्यामुळे रुपालीला पहाटे तीन वाजता उठून आंघोळ करावी लागत होती.

परिणामी, परिस्थितीला गांजून रुपालीच्या भावाने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. त्यामुळे शेवटी रुपालीने शाळा सोडून घरची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली.