तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:42 IST2026-05-06T15:39:27+5:302026-05-06T15:42:31+5:30

Tamilnadu Assembly Election Result: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून केवळ एकच नाव सर्वांच्या ओठांवर आहे. ते म्हणजे थलपती विजय. विजय याच्या पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच आता तो मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून केवळ एकच नाव सर्वांच्या ओठांवर आहे. ते म्हणजे थलपती विजय. विजय याच्या पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच आता तो मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

विजयच्या पक्षाला मिळालेल्या यशामुळे त्याच्या आई-वडिलांच्या आनंदाचा पारावार उरलेला नाही. तसेच विजय याच्या यशस्वी कारकिर्दीमागे त्याच्या आई वडिलांचं मोठं योगदान आहे.

अभिनेता विजय याचे वडील तामिळ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत हे सर्वांना माहिती आहे. मात्र विजयच्या आईबाबत फारच कमी माहिती लोकांना आहे. पण विजयची आईसुद्धा तामिळ इंडस्ट्रीमधील चर्चित नाव आहे. तसेच विजयला सुपरस्टार बनवण्यामध्ये तिचंही फार मोठं योगदान आहे.

विजयची आई शोभा चंद्रशेखर यांनी तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये गायिका, निर्माती, पटकथालेखिका आणि दिग्दर्शिका आहेत.

शोभा यांनी लाईट म्युझिक ट्रूप्समध्ये परफॉर्म केलं आहे. तामिळ चित्रपटांसाठी त्यांनी अनेक प्लेबॅक साँग रेकॉर्ड केले आहेत. तसेच विजयसोबत त्यांनी डुएट गाणंही गायलं आहे.

शोभा चंद्रशेखर यांचं पहिलं चित्रपट गीत महाराजा ओरू महारानी हे होतं. हे इरू मलिगई चित्रपटामधील होतं. शोभा यांनी १० चित्रपटांची निर्मितीही केली आहे.

शोभा चंद्रशेखर यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये नालैया थीरपू आणि आधी यांचा समावेश आहे. कलाक्षेत्रातील योगदानासाठी तामिळनाडू सरकारने त्यांना कलईमामणी पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.